सातारा : अपघात करुन नुकसान केल्याप्रकरणी बस चालकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सत्यम संतोष साबळे रा. शिवथर, ता. सातारा यांच्या मालवाहतूक टेम्पो क्र. एमएच 11 डीडी 4306 ला भरधाव वेगाने येऊन इलेक्ट्रिक बसने पाठीमागून धडक देऊन टेम्पोचे नुकसान केल्याप्रकरणी बस चालक सागर संपत जगताप रा. रेवडी, ता. कोरेगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.