सातारा : स्वतःवर ब्लेडने वार करून घेऊन इच्छापूर्वक दुखापत केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास निलेश अरुण एटांबे रा. पार्ले, कराड याने त्याची पत्नी सोबत राहू देत नसल्याच्या कारणावरून शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या समोर स्वतःच्या हातावर निष्काळजीपणे ब्लेडने कापून घेऊन जखमी झाला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार माने करीत आहेत.