सातारा : खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास शंकर आप्पा शिंदे रा. खंडोबाची वाडी, ता. सातारा हे मोटरसायकलवर बसून मोबाईल पाहत असताना रवींद्र उर्फ रोहित आत्माराम शिंदे यांनी शंकर शिंदे यांना शिवीगाळ करीत बरोबर आणलेल्या कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यात वार करून जखमी केले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरडे करीत आहेत.