सातारा : विवीध सामाजिक संघटना व संस्था यांच्यावतीने विचारवेध व्याख्यानमाला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील सभागृहात सुरू होत आहेत.त्यापार्श्वभूमीवर गीतमैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथम पुष्प प्रमूख वक्ते कॅप्टन डॉ. राजशेखर निलोलू यांचे, "डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणी कामगार विषयक धोरण" या विषयावर मार्गदर्शन झाले. ऍड. रोजेंद्र गलांडे यांचे नविन सामाजिक सुरक्षा विषयक प्राथमिक मार्गदर्शन झाले. अध्यक्षस्थानी सम्यक ज्येष्ट ज्येष्ट नागरिक संघाचे अध्यक्ष शामराव बनसोडे होते.
द्वितीय पुष्प यामध्ये लुम्बिनी संघाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.गोरख बनसोडे यांचे,"चक्रवर्ती सम्राट अशोक जीवन संघर्ष" या विषयावर प्रमुख व्याख्यान होणार असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांचे, "महाबोधी महाविहार आंदोलन" या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. अध्यक्षस्थान भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष ऍड.विजयानंद कांबळे भूषवणार आहेत.तृतीय पुष्प प्रा. प्रदीप शिंदे यांचे, "क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचे समग्र विचार" या विषयावर मार्गदर्शन होणार असून मच्छींद्र जाधव यांचे आजचे शैक्षणिक धोरणावर मार्गदर्शन होणार आहे. अध्यक्षस्थान गणेश कारंडे भूषवणार आहेत.अनिल वीर परिचय करून देणार आहेत.
व्याख्यान मालेच्या पूर्वसंध्येला भिमगीतांचा कार्यक्रमात माणिक आढाव, माणिक कांबळे,शेखर कांबळे,यशपाल बनसोडे, हृदयनाथ गायकवाड आदी कलाकारांनी सहभाग होऊन रंगत आणली. प्रथमतः डॉ. आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अनिल वीर,भाऊ धाइंजे व शेखर कांबळे यांनी अर्पण करून अभिवादन केले.ऍड.हौसेराव धुमाळ,विलास कांबळे व सीताराम गायकवाड यांनी पुष्पांजली अर्पण केली.माणिक आढाव व ऍड.हौसेराव धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी म.बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. चंद्रकांत खंडाईत यांनी स्वागत केले. सदरच्या कार्यक्रमास सम्यक ज्येष्ट नागरीक संघाचे बी.एल.माने, प्राचार्य अरुण गाडे, महेंद्र भोसले, मधुकर आठवले, आदिनाथ बिराजे, मच्छिन्नद्र जाधव, शाहिर श्रीरंग रणदिवे, शाहीर आर.गायकवाड, संजय नंदकुमार काळे व संपूर्ण परिवार, मुरलीधर खरात, सावंत, दत्ताराम हिरवे, अंकुश धाइंजे, संभाजी जाधव, वसंतराव डीके, नारायण जावळीकर, सीताराम गायकवाड, दादासाहेब केंगार, शहर व परीसरातील सर्व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, युवक, युवती, उपासक, उपासिका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. याकामी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, भारतीय बौद्ध महासभा, सम्यक जेष्ठ नागरीक संघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, भिमाबाई आंबेडकर प्रतिष्ठान, संबोधी प्रतिष्ठान, धम्मशील चारिटेबल ट्रस्ट, परीवर्तन मित्र समुह, संत रोहीदास सामाजीक संस्था, बंधुत्व प्रतिष्ठान, तथागत फाऊंडेशन, रिपब्लिकन सेना आदी तत्सम संघटना अथक परिश्रम घेत आहेत.