शेंद्रे गावच्या हद्दीत विदेशी दारूसह स्विफ्ट कार जप्त; तब्बल साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

by Team Satara Today | published on : 10 November 2025


सातारा : सातारा तालुका पोलिसांनी विदेशी दारूची चोरटी विक्री करणाऱ्या दोघांना अटक करून तब्बल साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शेंद्रे गावच्या हद्दीत कोल्हापूर-पुणे सर्व्हिस रोडवर करण्यात आली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सागर चंद्रकांत साठे (वय 29, रा. खोजेवाडी, ता. जि. सातारा) आणि त्याचा एक साथीदार हे विदेशी दारूची बेकायदा वाहतूक करून विक्रीसाठी नेत होते. दरम्यान, पोलिसांनी संशयित वाहनाला अडवून तपासणी केली असता 96 हजार 800 रुपये किमतीची विदेशी दारू आणि सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार असा एकूण 4 लाख 46 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अण्णासाहेब पाटील महामंडळाचे काम सुरळीत सुरू; महामंडळाच्यावतीनं प्रेस नोट काढून जाहीर
पुढील बातमी
सातारा पालिकेसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारी मुलाखती

संबंधित बातम्या