सातारा : खुनाच्या प्रयत्नासह मारहाण केल्याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात 18 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दि. 1 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास प्रसाद रत्नाकर शेळके (रा. शेळकेवाडी, पोस्ट सोनगाव, ता. सातारा) यांना बैलाचे स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून तेथीलच अमोल बाळकृष्ण कदम, वैभव हिम्मत आढाव, रोहित राजेंद्र आढाव, आकाश संदीप उर्फ संजय शेळके, प्रतीक विजय शेळके, साहिल नवनाथ शेळके, रवींद्र सुरेश शेळके, सुरेश मारुती शेळके यांनी दगडाने, लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
दरम्यान अमोल बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रसाद रत्नाकर शेळके, अक्षय उद्धव शेळके, योगेश उद्धव शेळके, प्रवीण विठ्ठल शेळके, श्रीमंत विठ्ठल शेळके, संजीवन प्रवीण शेळके, विठ्ठल बाबुराव शेळके, प्रणव प्रवीण शेळके, अक्षय राजाराम शेळके, मनोज खाशाबा शेळके यांनी तक्रारदारांसह त्यांचे चुलते सुरेश मारुती शेळके व भाचा रोहित आढाव यांना कोयत्याने, लोखंडी रॉडने आणि काठीने मारहाण केल्याचे म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कुंभार करीत आहेत.