मोबाईल स्नॅचिंग प्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 13 August 2024


सातारा : जबरदस्तीने मोबाईल फोन हिसकावून नेल्याप्रकरणी तीन अज्ञातांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास राधिका चौक ते कोटेश्वर मंदिर जाणाऱ्या रस्त्यावर कोमल धनाजी माने सध्या रा. शाहूपुरी, सातारा यांच्या मैत्रिणीचा मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तीन चोरट्यांनी हिसकावून जबरदस्तीने चोरून नेला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार घोडके करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा बस स्थानकातून मंगळसूत्राची चोरी
पुढील बातमी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत  सातारा येथे रविवारी होणार भव्य मेळावा

संबंधित बातम्या