08:48pm | Nov 28, 2024 |
सातारा : गोडोली येथील भागामध्ये पाणी टँकर उपलब्ध होत नसल्याच्या कारणावरून पालिकेच्या परिवहन विभागाचे अधिकारी प्रशांत निकम गोडोलीचे माजी नगरसेवक शेखर मोरे यांच्यात जोरदार हमरातुमरी झाली. यावेळी मोरे यांनी निकम यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप पालिका कर्मचार्यांनी करत गुरुवारी दिवसभर काम बंद आंदोलन केले. याबाबतची तक्रार मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे करणार असल्याचे कर्मचारी युनियनच्या सदस्यांनी सांगितले. याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्याधिकार्यांनी दिले आहे.
प्राधिकरणाच्या जलवाहिनीचे काम सुरू असल्यामुळे गोडोली, शाहूनगर, कामाठीपुरा या भागाला गेल्या दोन दिवसापासून पाणी येत नाही. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी माजी नगरसेवक शेखर मोरे यांनी केली होती. मात्र सातारा पालिकेचा टँकर दूरवर गेला असल्यामुळे सध्या पाणी देता येणे शक्य नसल्याची बतावणी अधिकारी प्रशांत निकम यांनी केली. टँकर येत नसल्याच्या कारणास्तव संतापलेल्या शेखर मोरे यांनी पालिकेत येऊन निकम यांना विचारणा केली. त्यावेळी शब्दाला शब्द वाढत जाऊन दोघांमध्ये जोरदार हमरातुमरी झाली. यावेळी काही कर्मचार्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे वादावर पडदा पडला.
सातारा पालिकेच्या कर्मचार्यांनी तातडीने या घटनेची दखल घेऊन काम बंद आंदोलन सुरू केले. अचानक काम बंद झाल्यामुळे सातारा पालिकेचे 35 विभाग बंद झाले. सर्व कर्मचार्यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर येऊन निषेध आंदोलन केले. नंतर कर्मचारी पालिका युनियनचे सचिव मनोज बिवाल आणि त्यांच्या सहकार्यांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणाची तक्रार केली.
याबाबत शेखर मोरे यांच्याशी संपर्क साधला असता पालिकेचे कर्मचारी गोडोली सारख्या भागाला पाणीपुरवठा करत नसल्याने नागरिकांना अडचण होत आहे. तसेच पाणी देण्याच्या ऐवजी उलट सुलट उत्तरे देत आहेत. अशा कर्मचार्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी अपेक्षा मोरे यांनी व्यक्त केली. निकम यांच्या विरोधात गोडोली ग्रामस्थ पालिकेवर मोर्चा काढणार असल्याची माहिती आहे. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून तातडीने अहवाल घेऊन योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन दिले आहे.
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |
कोळेवाडी ग्रामसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा ठराव |
सर्वांना बरोबर घेऊन मलकापूरचा विकास करणार : आ. डॉ. अतुलबाबा भोसले |