नवी दिल्ली : लष्कारातील उत्पादने ‘मेड इन इंडिया’ करण्याचे धोरण मोदी सरकारने आखले आहे. यामुळे भारतीय लष्कारातील उत्पादने खासगी कंपन्याही आता विकसित करु लागल्या आहेत. देशातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळख असलेल्या टाटा समूह हवाईदलासाठी विमाने बनवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज सोमवारी टाटा एअरक्रॉप्ट कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करत आहेत. या कॉम्प्लेक्समध्ये C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बनणार आहे. भारत आणि स्पेन दरम्यान 56 विमाने बनवण्याचा करार झाला आहे. त्यातील 16 विमाने स्पेनमध्ये तयार होणार आहे. त्यानंतर 40 विमाने टाटा एडवान्स सिस्टम्स लिमिटेड गुजरातमधील वडोदरा येथे बनवणार आहे.
टाटा एडवान्स सिस्टम्स लिमिटेड विमान बनवणारी देशातील पहिली खासगी कंपनी ठरली आहे. C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टची गरज भारतीय हवाईदलास होती. त्यामाध्यमातून सैनिक, शस्त्रास्त्रे, इंधन एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी नेते येणार आहे. C295 कमी वजनाच्या सामग्रची वाहतूक करणार आहे.
C-295 विमान दोन व्यक्ती उडवू शकतात. त्यात 73 सैनिक किंवा 48 पॅराट्रूपर्स बसू शकतात. तसेच 12 स्ट्रेचर इंटेसिव्ह केयर मेडवॅक किंवा 27 स्ट्रेचर मेडवॅकसोबत 4 मेडिकल अटेंडेंट प्रवास करु शकतात. हे एअरक्रॉप्ट जास्तीत जास्त 9250 kg वजन घेऊन जाऊ शकते. त्याची लांबी 80.3 फूट, विंगस्पॅन 84.8 फूट आणि उंची 28.5 फूट आहे. या एअरक्राफ्टमध्ये 7650 लिटर इंधन येते. 482 km/hr वेगाने ते उडू शकते. त्याची रेंज 1277 ते 4587 किमी आहे. त्यात किती वजन आहे, त्यावर रेंज ठरणार आहे. जास्तीत जास्त 13,533 फूट उंच ते जाऊ शकते.
C-295 विमान 844 मीटर ते 934 मीटर लांबीच्या रनवेवरुन उड्डान घेऊ शकते. त्याला उतरण्यासाठी फक्त 420 मीटरचा रनवे लागतो. त्यात सहा हार्ड पॉइंट्स आहेत. म्हणजेच शस्त्रे आणि संरक्षण यंत्रणा बसवण्याची जागा आहे. दोन्ही पंखाखाली प्रत्येकी तीन किंवा इनबोर्ड पाइलॉन्स असू शकतात. ज्यामध्ये 800 किलो वजनाची शस्त्रे बसवता येतील.
टाटाने गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून 40 विमानांसाठी मेटल कटिंगचे काम सुरू केले आहे. हैदराबाद सध्या त्याचे मुख्य काम सुरु आहे. अनेक भाग या ठिकाणी साठवले जात आहेत. टाटाचे हैदराबाद केंद्र विमानाचे प्रमुख भाग तयार करेल. त्यानंतर त्याला वडोदरा येथे पाठवले जाईल.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |