08:53pm | Jan 27, 2025 |
सातारा : जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत सातारा जिल्ह्यासाठी तब्बल 712 कोटी रुपयांच्या विकासा आराखड्याला अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये मंजुरी देण्यात आली. या आराखड्यामध्ये विविध विषयांचा आढावा घेण्यात येऊन विकास कामांसाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित दादा पवार यांच्याकडे बैठकीत पाठपुरावा करणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी बैठकीनंतर सांगितले. त्यानंतर ते तात्काळ मुंबईसाठी रवाना झाले.
या बैठकीला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन तसेच प्रशासनाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातील प्राधान्य क्रमाने राहिलेल्या प्रकल्पांचा आढावा घेऊन त्याकरिता लागणाऱ्या निधीचा सविस्तर आढावा शंभूराज देसाई यांनी घेतला. याबाबतचे सादरीकरण जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांनी केले.
बैठकीमध्ये 712 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला अवघ्या पंधरा मिनिटात मंजुरी मिळाली. सातारा जिल्ह्यातील जिल्हा कार्यक्षेत्र अंतर्गत येणारी मार्ग साकव पूल पर्यटन स्थळांचा विकास कृषी पंपांना वीज जोडणी तसेच आपत्कालीन निधी डोंगरी भागासाठी प्रलंबित कामांसाठी लागणारा निधी या सर्वच कामांचा शंभुराज देसाई यांनी पालकमंत्री म्हणून बारकाईने आढावा घेतला. या कामासंदर्भात स्वतंत्र आराखडे तयार करून अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रस्ताव करावेत. तसेच जास्तीत जास्त निधी आणण्यासंदर्भात तपशीलवार सादरीकरण व्हावे, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या. बैठकीनंतर या सर्व प्रक्रियेची त्यांनी माहिती दिली. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही सर्व चारही मंत्री निश्चित पाठपुरावा करू. वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मंगळवारी बैठक होणार असून या बैठकीमध्ये सातारा जिल्ह्यासाठी आम्ही निधी आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे ते म्हणाले.
प्रतापगड प्राधिकरण समितीच्या अध्यक्षतेखाली ऐतिहासिक प्रतापगड किल्ल्याचे संवर्धन सुरू आहे येथील निकृष्ट कामाच्या संदर्भात तक्रारी झाल्या होत्या. याबाबत त्यांना विचारले असता शंभूराज देसाई म्हणाले, याबाबत मंत्रालयात लवकरच बैठक होत असून या बैठकीला खासदार मकरंद पाटील उपस्थित राहणार आहेत. प्रतापगड प्राधिकरण समितीच्या वतीने सर्व आढावा घेण्यात येईल. राज्य शासनाचे या कामावर बारकाईने लक्ष आहे. कामे दर्जेदार होतील याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात येतील, असे ते म्हणाले.बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
महिलांच्या विनयभंग प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
सातारा शहर परिसरातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
पन्हाळा परिसरातून आवळल्या कोंडवे गोळीबार प्रकरणातील तीन जणांच्या मुसक्या |
अवैधरित्या अग्नीशस्त्र विक्री प्रकरणी तीन युवकांना अटक |
कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या सोडत पध्दतीवर अभिप्राय नोंदविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन |
रिदमिक व ट्रॅडिशनल योगासन स्पर्धेमध्ये सई ढाणेचे यश |
विठुरायाचे आता थेट दर्शन मिळणार |
सातारा जिल्ह्यातील अपशिंगे येथे युद्ध स्मारक उभारणार : माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई |
गणिताच्या संपादणूकीत सातारा राज्यात अव्वल |
महिलेस धमकी दिल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून सुमारे सव्वा लाखांची फसवणूक |
जरंडेश्वर नाका परिसरात चैन स्नॅचिंग |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या अग्नीशस्त्र विक्री प्रकरणी तीन युवकांना अटक |
कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या सोडत पध्दतीवर अभिप्राय नोंदविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन |
रिदमिक व ट्रॅडिशनल योगासन स्पर्धेमध्ये सई ढाणेचे यश |
विठुरायाचे आता थेट दर्शन मिळणार |
सातारा जिल्ह्यातील अपशिंगे येथे युद्ध स्मारक उभारणार : माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई |
गणिताच्या संपादणूकीत सातारा राज्यात अव्वल |
महिलेस धमकी दिल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून सुमारे सव्वा लाखांची फसवणूक |
जरंडेश्वर नाका परिसरात चैन स्नॅचिंग |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
मंगळवार पेठेत साठ हजारांची घरफोडी |
देऊर येथील दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी |
कोंडवे येथील गोळीबार प्रकरणातील एकास अटक |
बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न करणारे पाचजण ताब्यात |