पायी चालणं ही एक सगळ्यात सोपी, प्रभावी एक्सरसाईज मानली जाते. बरेच लोक रोज पायी चालायला जातात. त्यांना पायी चालण्याचे मोजकेच फायदे माहीत असतात. तर बरेच लोक पायी चालण्याला महत्व देण्याऐवजी हार्ड एक्सरसाईज करण्यावर भर देतात. मात्र, पायी चालणं ही एक अशी एक्सरसाईज आहे ज्याद्वारे तुम्ही अनेक समस्या दूर करू शकता आणि खूपसारे फायदे मिळवू शकता. ज्याबाबत लोकांना कमीच माहीत असतं.
पायी चालण्याचे फायदे
रोज पायी चालल्यास वजन कमी होतं, हृदय निरोगी राहतं, स्नायू मजबूत होतात आणि मानसिक आरोग्यही चांगलं ठेवण्यास मदत मिळते. जर योग्य पद्धतीनं पायी चालाल तर कोणत्याही हाय इंटेंसिटी एक्सरसाईज इतकाच यातूनही फायदा मिळतो.
स्नायू मजबूत होतात
जिम ट्रेनर म्हणत असतील की, पायी चालल्यानं स्नायू मजबूत होत नाहीत. मात्र, नियमितपणे पायी चालल्यास शरीरातील अनेक स्नायू सक्रिय होतात. खासकरून काफ, हॅमस्ट्रिंग, क्वाड्रिसेप्स आणि कोर मसल्स मजबूत होतात. खड्डे, उंचवटे असलेल्या जमिनीवर चालल्यास स्नायूंची ताकद वाढते.
मानसिक आरोग्य चांगलं राहतं
पायी चालणं केवळ शरीरच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही चांगलं असतं. १० ते १५ मिनिटं रोज वेगानं चालल्यास स्ट्रेस वाढणारं कोर्टिसोल हार्मोन कमी होतं आणि मूड चांगला होतो. जेव्हाही काही गोड खाण्याची इच्छा होत असेल तर १० मिनिटं पायी चाला. असं केल्यास भूक नियंत्रित होईल आणि इमोशनल ईटिंग टाळता येईल.
चप्पल-शूज न घालता चाला
चप्पल किंवा शूज न घालता गवत किंवा वाळूवर चालल्यास पायांचे स्नायू मजबूत होतात आणि संतुलन सुधारतं. आधुनिक शूजमुळे पायांची नॅचरल शक्ती कमी होते, त्यामुळे रोज १५ ते २० मिनिटं गवत किंवा वाळूवर शूज न घालता चालावं.
आयुष्य वाढवा
रोज पायी चालल्यानं शरीरातील ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. सूज कमी होते आणि त्वचाही चांगली राहते. जर तुम्हाला अॅंटी-एजिंग फायदा मिळवायचा असेल तर आठवड्यातून दोनदा स्ट्रेंथ ट्रेनिंगसोबतच नियमितपणे चालण्याची सवय लावा.