शेंद्रे परिसरात ड्रग्ज विक्रेत्यांवर तालुका पोलिसांच्या डी.बी पथकाची कारवाई; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

by Team Satara Today | published on : 08 April 2026


सातारा : सातारा तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने शेंद्रे परिसरात धाडसी कारवाई करत ड्रग्ज विक्रीसाठी येणाऱ्या दोन जणांना पकडून सुमारे ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी अक्षय रामचंद्र पाटील (वय ३०, रा.उजळाईवाडी कोल्हापूर आणि अलंकार अभिजीत मुळीक (वय २५ रा. कासारवाडी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) यांच्यावर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शेंद्रे (ता. जि. सातारा) हद्दीत एका चारचाकी वाहनातून बेकायदेशीर ड्रग्ज विक्री होणार असल्याची खबर मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत दि ७ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास शेंद्रे ते बोगदा रोडवर संशयित टोयोटा इटिओस ही कार अडवली.

गाडीत असलेल्या संशयितांनी चौकशीदरम्यान उडवाउडवीची उत्तरे दिल्याने आणि तपासणीस विरोध केल्याने पोलिसांनी पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली. या झडतीत सुमारे ४ लाख ८० हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम ब्राऊनिश हेरॉईन, २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन आणि अंदाजे ४ लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन असा एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रिया शिंदे यांच्या कुणबी (ओबीसी) प्रमाणपत्रावर आक्षेप घेत कायदेशीर आव्हान; जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे तक्रार
पुढील बातमी
शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली साताऱ्यात नागरिकांची तब्बल ७० लाखांची फसवणूक; दोन जणांविरोधात शहर पोलिसांत गुन्हा

संबंधित बातम्या