05:05pm | Aug 20, 2024 |
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) काही दिवसांपूर्वी काढलेल्या सरळ भरती प्रक्रियेवरुन (लॅटरल एंट्री) वादळ सुरु आहे. विरोधकांनी यावरुन सरकारला धारेवर धरले आहे. परंतु आता केंद्र सरकारने मंगळवारी लॅटरल एंट्रीच्या जाहिरात मागे घेतली आहे. कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांनी यासंदर्भात यूपीएससी अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. त्यांनी ही प्रक्रिया राबवताना सामाजिक न्याय आणि आरक्षण प्रणाली लक्षात ठेवणे गरजेचे असल्याचे यूपीएससी चेअरमन प्रीती सूदन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
45 पदांची होणार होती भरती :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार थेट भरतीच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी, यूपीएससीने 17 ऑगस्ट रोजी एक जाहिरात काढली होती. त्या जाहिरातीनुसार 45 सहसचिव, उपसचिव आणि संचालक स्तरावरील भरती लॅटरल एंट्रीद्वारे करण्यात येणार होती. त्यामध्ये यूपीएससी परीक्षा न देताही निवड केली जाणार होती. यामध्ये आरक्षणाचे नियमसुद्धा लागू होणार नव्हते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रक्रियला विरोध केला होता. त्यांनी म्हटले होते की, लॅटरल एन्ट्रीद्वारे महत्त्वाच्या पदांवर भरती करून एससी, एसटी आणि ओबीसी वर्गाचे आरक्षण उघडपणे हिसकावले जात आहे.
घटक दलांकडून विरोध :
यूपीएससीमध्ये सरळ भरतीच्या निर्णयाला भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमधील काही घटक पक्षांकडूनही विरोध झाला. जनता दल (युनायटेड) आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांनी या निर्णयाला विरोध केला. परंतु तेलगू देसम पक्ष (टीडीपी) समर्थन दिले. टीडीपीने म्हटले की, नोकरशाहीमध्ये सरळ भरती प्रक्रियेमुळे शासनाची गुणवत्ता वाढेल.
लॅटरल एंट्री आहे काय?
लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची केंद्र सरकारमधील मंत्रालयात सरळ भरती केली जाते. ही भरती जॉइंट सेक्रेट्री, डायरेक्टर आणि डिप्टी सेक्रेट्ररी या पदांवर होणार होती. खासगी क्षेत्रात काम करणारे 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणारे लोकांची यामध्ये भरती केली जाणार होती. त्यासाठी 45 वर्षे वयमर्यादा होती. तसेच कोणत्या विद्यापीठ आणि संस्थेची पदवी असणे आवश्यक आहे.
अश्विनी वैष्णव यांची काँग्रेसवर टीका :
केंद्रीय रेल्वे, दूरसंचार आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लॅटरल एन्ट्रीवरुन काँग्रेसवर हल्ला केला. त्यांनी काँग्रेस काळात झालेल्या भरतीची उदाहरणे दिली. अश्विनी वैष्णव यांनी म्हटले की, 1970 पासून लॅटरल एन्ट्री सुरु आहे. काँग्रेस सरकारने मनमोहन सिंग, मोटेक सिंह आहलूवालिया यांची भरती याच पद्धतीने केली होती.
काँग्रेस काळात कोणाची झाली भरती :
1971 मध्ये मनमोहन सिंग यांची लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून परराष्ट्र, व्यापार मंत्रालयात सल्लागार झाले होते. त्यानंतर ते अर्थमंत्री आणि देशाचे पंतप्रधान झाले.
2013 मध्ये रघुराम राजन यांचा प्रवेश लॅटरल एंट्रीने मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून झाला. 2013 ते 2016 दरम्यान ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते.
बिमल जालनसुद्धा लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून काँग्रेस सरकारमध्ये मुख्य आर्थिक सल्लगार आणि त्यानंतर आरबीआय गव्हर्नर झाले होते.
सॅम पित्रौदा, कौशिक बसु, व्ही. कृष्णमूर्ती, अरविंद विरमानी यांची नियुक्तीसुद्धा लॅटरल एंट्रीमधून झाली आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |