सातारा शहरात महिलेचा विनयभंग व मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा

by Team Satara Today | published on : 22 January 2026


सातारा  : सातारा शहरालगतच्या एका उपनगरात ३२ वर्षीय महिलेचा विनयभंग करून मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. दि. १८ जानेवारी रोजी रात्री १ ते २.३० वाजण्याच्या सुमारास सात जणांनी जबरदस्तीने घरात प्रवेश करून अश्लील शिवीगाळ, दमदाटी करत फिर्यादी महिलेला बेदम मारहाण केली.या घटनेत फिर्यादीच्या डोक्यात कढई मारण्यात आली असून तिच्या मुलीला व आईलाही मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. यामध्ये दोन अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार अवघडे करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
करंजे नाक्यावर जुगार अड्ड्यावर छापा; ९४० रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त
पुढील बातमी
कोडोली येथील सनी हॉटेलच्या पार्किंगमधूनयेथून दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या