कझाकिस्तान : अझरबैजानहून रशियाला जाणारे प्रवासी विमान अकताऊ कझाकिस्तानजवळ कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर २९ जण बचावले. ही दुर्घटना २५ डिसेंबर रोजी घडली होती. या अपघाताबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हे प्रवासी विमान रशियन अँटी-एअरक्राफ्ट सिस्टमने खाली पाडले असावे, असे प्राथमिक संकेत सूचित करत असल्याचा दावा एका अमेरिकेच्या अधिकाऱ्याने केला आहे. याबाबतचे वृत्त सीएनएनने दिले आहे.
अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की हे संकेत असे दर्शवतात की रशियन सिस्टमने अझरबैजान एअरलाइन्सच्या J2-8243 विमानावर हल्ला केला. त्यानंतर ते अकताऊ शहराजवळ क्रॅश झाले. अमेरिकेने बुधवारी कोसळलेल्या विमान दुर्घटना घटनेचे मूल्यांकन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या विमान दुर्घटनेत ६७ पैकी किमान ३८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, अझरबैजान, कझाकिस्तान आणि रशियाच्या अधिकाऱ्यांनी लोकांना विनंती केली आहे की, जोपर्यंत या दुर्घटनेचा तपास पूर्ण होत नाही; तोपर्यंत अपघाताबाबत कोणतेही अंदाज बांधू नका.
या दुर्घटनेच्या चौकशीसाठी कझाकिस्तान, अझरबैजान आणि रशियातील प्रतिनिधींचा समावेश असलेला एक आयोग स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती कझाकिस्तानचे उपपंतप्रधान कानट बोजुम्बायेव यांनी दिली आहे. कझाक स्टेट मीडियाच्या माहितीनुसार, रशिया आणि अझरबैजानच्या एजन्सींना फॉरेन्सिक तपासणी करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कझाकिस्तानमधील वृत्तसंस्था काझिनफॉर्मच्या वृत्तानुसार, क्रॅश साइटवर दुसरा ब्लॅक बॉक्स सापडला. यामुळे अपघात नेमका कसा घडला? हे शोधण्यास मदत होईल. स्कॅनमध्ये सापडलेल्या ब्लॅक बॉक्सची माहिती घेण्यासाठी सुमारे दोन आठवडे लागतील, असे बोजुम्बायेव यांनी म्हटले आहे.
अझरबैजान एअरलाइन्सने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान अझरबैजानची राजधानी बाकू येथून चेचन्याच्या दक्षिणेकडील रशियन प्रजासत्ताकची राजधानी ग्रोझनी येथे जात होते. पण विमानाला अकताऊपासून सुमारे ३ किलोमीटर (१.८ मैल) अंतरावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. यादरम्यान विमान कोसळले. ग्रोझनीमधील दाट धुक्यामुळे विमानाचा मार्ग बदलण्यात आल्याचे वृत्त रशियन स्टेट मीडियाने दिले आहे.
फ्लाइट-ट्रॅकिंग वेबसाइट Flightradar24 च्या माहितीनुसार, विमान बुधवारी सकाळी ७:५५ वाजता अझरबैजानमधील स्थानिक वेळेनुसार १०:५५ वाजता निघाले आणि ते सुमारे अडीच तासांनंतर क्रॅश झाले.
प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी |
साताऱ्यात दि. २६ रोजी जयपूर फूट शिबिराचे आयोजन |
थोरले प्रतापसिंह हे काळाच्याही पुढे असणारे प्रजाहितदक्ष राजे होते |
संघर्षशील एन.डी. सरांना कृतिशील राहून आवाज उठवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल |
जीवन परिवर्तनात पुस्तकांची भूमिका मोलाची |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
‘मानिनी जत्रा’ सारखे उपक्रम बचतगटांसाठी नवसंजीवनी |
आई, मी 1000 सूर्यनमस्कार पुर्ण केले..!’ |
डिजिटल नकाशे म्हणजे मालमत्तेचे वैध पुरावे |
जिल्ह्यात पुन्हा एकदा ''शंभूराज" |