विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 04 July 2025


सातारा : विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवाहित महिलेला मॅसेंजरवरुन वारंवार कॉल करुन विनयभंग केल्याप्रकरणी अमोल देवकर (रा.देवकरवाडी ता.सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 23 जून पासून वेळोवेळी घडली असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.  अधिक तपास पोलीस हवालदार पोळ करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बेदरकारपणे वाहन चालविल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
दोन कामगारांच्या वादातून एकाचा खून

संबंधित बातम्या