01:32pm | Dec 28, 2024 |
पुणे : वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडणाऱ्या पुणे प्रादेशिक विभागातील पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेमध्ये तब्बल दोन लाखांचा टप्पा गाठला आहे. पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील २ लाख ११३ वीजग्राहकांनी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करीत पर्यावरणपूरक योजनेला पसंती दिली आहे. तसेच 'गो-ग्रीन' योजनेमुळे या ग्राहकांना वार्षिक २ कोटी ४० लाख १३ हजार ५६० रुपयांचा फायदा होत आहे.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत ५ लाख २४५ पर्यावरणस्नेही वीजग्राहक या योजनेत सहभागी झाले आहेत. यात सर्वाधिक म्हणजे ४० टक्के प्रतिसाद पुणे प्रादेशिक विभागात मिळाला असून राज्यात महावितरणच्या १६ परिमंडलांमध्ये सर्वाधिक पुणे परिमंडलामध्ये १ लाख ३४ हजार वीजग्राहक या योजनेत सहभागी झाले आहेत. महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडल्यास प्रतिबिल व प्रतिमहिना १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे.
पर्यावरणात दिवसेंदिवस प्रतिकूल बदल होत आहे. त्यामुळे 'गो-ग्रीन' योजना ही काळाची गरज झाली आहे. पुणे प्रादेशिक विभागातील वीजग्राहकांचा सर्वाधिक प्रतिसाद अतिशय कौतुकास्पद आहे. 'गो-ग्रीन'मधील ग्राहकांना 'ई-मेल' व 'एसएमएस'द्वारे वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा लाभ घेऊन ऑनलाइनद्वारे त्वरित वीज बिल भरणा करणे आणखी शक्य झाले आहे. लघुदाब वीजग्राहकांनी कागदी बिलांचा वापर बंद करून 'गो-ग्रीन' योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केले आहे.
पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत 'गो-ग्रीन' योजनेमध्ये पुणे जिल्ह्यातील १ लाख ४३ हजार ३६८ ग्राहक सहभागी झाले आहेत त्यांचा १ कोटी ७२ लाख ४ हजार १६० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. तर सातारा जिल्ह्यातील १३ हजार १५३ ग्राहकांना १५ लाख ७८ हजार ३६० रुपये, सोलापूर जिल्ह्यातील १४ हजार २३१ ग्राहकांना १७ लाख ७ हजार ७२० रुपये, कोल्हापूर जिल्ह्यातील १८ हजार ४५ ग्राहकांना २१ लाख ६५ हजार ४०० रुपये आणि सांगली जिल्ह्यातील ११ हजार ३१६ ग्राहकांना १३ लाख ५७ हजार ९२० रुपयांचा वीजबिलांमध्ये वार्षिक फायदा होत आहे.
'गो-ग्रीन' योजनेतून कागदी वीजबिलांचा वापर बंद केला तरी महावितरण मोबाईल अॅप व वेबसाईटवर ग्राहकांसाठी चालू व मागील वीजबिल तसेच वीजबिल भरण्याच्या पावत्या आदींची माहिती उपलब्ध आहे. 'गो-ग्रीन' मधील ग्राहकांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. त्याची गरजेनुसार केव्हाही प्रिंट काढता येईल. सोबतच वेबसाईटवर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. 'गो-ग्रीन' योजनेचा पर्याय निवडण्यासाठी वीजग्राहकांसाठी महावितरणचे मोबाईल अॅप किंवा www.mahadiscom.in वेबसाईट येथे सुविधा उपलब्ध आहे.
मारहाण प्रकरणी चारजणांवर गुन्हा |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चारचाकी चालकावर गुन्हा |
सोसायटी अध्यक्षाच्या घरात घुसून तरूणाचा पिस्तुलातून गोळीबार |
दि.7 ते दि.9 जानेवारी दरम्यान श्री शतचंडी यागाचे आयोजन |
तिहेरी अपघातात दुचाकी चालक ठार |
न्यू इंग्लिश स्कूल चे रविवारी 101वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा |
गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात 'छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना' या विषयावरील व्याख्यान |
उत्तेकर नगर मध्ये 55 हजारांची घरफोडी |
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
विलासपूर येथे सुमारे पावणे दोन लाखांची घरफोडी |
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
लग्नाच्या आमिषाने युवतीवर अत्याचार |
रहदारीस अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
आयेशा ताहेर मणेर हिचे सीए परीक्षेत यश |
सरपंच परिषदेचे रास्ता रोको नंतर धरणे आंदोलन |
न्यू इंग्लिश स्कूल चे रविवारी 101वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा |
गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात 'छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना' या विषयावरील व्याख्यान |
उत्तेकर नगर मध्ये 55 हजारांची घरफोडी |
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
विलासपूर येथे सुमारे पावणे दोन लाखांची घरफोडी |
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
लग्नाच्या आमिषाने युवतीवर अत्याचार |
रहदारीस अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
आयेशा ताहेर मणेर हिचे सीए परीक्षेत यश |
सरपंच परिषदेचे रास्ता रोको नंतर धरणे आंदोलन |
डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी |
डॉ. बाबासाहेब आंबेडकरवादी संघटनांचा सातारा शहरात मोर्चा |
बांधकाम विभागाने कामाच्या दर्जाबाबत तडजोड करू नये |
संगममाहुली येथील राजघाटाचे पुर्ननिर्माण करणार : मंत्री शिवेंद्रसिंहराजे |
तोतया ‘आयपीएस’चा आणखी सोळा जणांना गंडा |