सातारा : सातारा शहर पोलिसांनी दोन जुगार अडड्यांवर छापा मारीत दोनजणांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील बसस्थानकालगतच्या कन्हैय्या टी स्टॉलच्या पाठिमागे आडोशाला सुभाष उत्तम घाडगे (वय 37, रा. दौलतनगर, सातारा) हा जुगार घेताना दि. 20 रोजी आढळून आला. तसेच, वाढा फाटा येथील हॉटेल शिवतेज शेजारी श्रीकांत लक्ष्मण पाटील (वय 66, रा. पाटखळ, ता. सातारा) हा जुगार घेताना दि. 20 रोजी आढळून आला आहे. दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.