सातारा : टँकरला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी साडेदहा वाजण्याच्या सुमारास जिहे, ता. सातारा गावच्या हद्दीत राजाराम दत्तात्रय बर्गे रा. कोरेगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा यांनी त्यांच्या ताब्यातील दुचाकी क्र. एमएच 11 डीसी 7285 निष्काळजीपणे चालवून अतुल यशवंत वाढवे रा. धामणेर, ता. कोरेगाव जि. सातारा हे चालवीत असलेल्या दुधाचा टँकर क्र. एमएच 11 डीडी 5843 ला धडकवली. या अपघातात राजाराम बर्गे यांचा मृत्यू झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गुरव करीत आहेत.