सातारा : गोडोली फॉरेस्ट कॉलनी येथे दोन गटात जुन्या भांडणाच्या कारणावरून जोरदार राडा घालत एकमेकांना कोयत्याने मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी परस्पर विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे. ही घटना २३ रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली आहे.
यामध्ये अजित आबाजी कारंडे (वय २९ रा. कारंडवाडी देगाव,सातारा) याच्या फिर्यादीवरून शिवम दीपक पाटील (वय २९ रा. देगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर ग्रामसेवक शिवम दीपक पाटील यांच्या फिर्यादीवरून दादा पवार,अतुल भगत, अजित कारंडे यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सुडके आणि महिला पोलीस हवालदार देखणे तपास करत आहेत.