नवी दिल्ली : पंजाब, हरियाणा, उत्तर भारतातील शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये पुन्हा एकदा धुमश्चक्री होणार आहे. मोदी सरकारच्या धोरणांविरोधात शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. गेल्या 10 महिन्यांपासून शेतकरी सरकारच्या धोरणातील बदलाची प्रतिक्षा करत होते. गेल्या पाचहून अधिक वर्षांपासून या वादावर तोडगा काढण्यात मोदी सरकारला यश आलेले नाही. या आंदोलनावर जहरी टीका केल्याने उलट आंदोलन चिघळले होते. आज पुन्हा शेतकरी शंभू बॉर्डरहून दिल्लीकडे कूच करत आहे. शेतकर्यांचा पहिला जत्था, पहिली तुकडी दिल्लीकडे जाईल. त्यामुळे आजपासून दिल्ली सीमेवर पुन्हा महाभारत घडणार आहे.
पंजाबमधील शंबू बॉर्डरवर गेल्या 10 महिन्यांपासून शेतकरी डेरेदाखल आहेत. यापूर्वी मोदी सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. पण त्यात यशस्वी तोडगा निघाला नाही. आता शेतकरी पुन्हा दिल्लीकडे कूच करतील. शेतकरी नेते सरवन सिंह पंढेर यांनी सांगीतले की, 101 शेतकऱ्यांचा एक गट आज 6 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता शंभू बॉर्डरकडे कूच करतील. हा जत्था दिल्लीकडे मार्च करेल. मोर्चा घेऊन जाईल. आता तरी सरकारला जाग येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शंभू बॉर्डरवर माध्यमांशी संवाद साधताना पंढेर यांनी सरकारवर निशाणा साधला. आम्ही दुपारी एक वाजता शंभू बॉर्डर येथून दिल्लीकडे मोर्चा घेऊन जाणार आहोत. जर सरकार आमचा मोर्चा थांबवण्याचा प्रयत्न करतील तर तो आमचा नैतिक विजय असेल. यापूर्वी आम्ही ट्रॅक्टर घेऊन दिल्लीकडे मार्च काढला होता. त्यावेळी अनेकांनी आमच्यावर टीका केली होती. आमच्या वेदना कोणी पाहिल्या नाहीत. आता आम्ही पायी मोर्चा घेऊन जात आहोत. आता तरी कुणालाच आमच्याविषयी अडचण नसावी. आम्हाला थांबवण्याचे काही कारण नसावे.
यावेळी सरवन सिंह पंढेर यांनी केंद्र सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले. साध्या शेतकर्यांना हे सरकार इतके का घाबरत आहे, असा सवाल त्यांनी केला. पंजाब-हरियाणा सीमा रेषा आता पूर्वीप्रमाणे दिसत नाही. उलट हे एखादं आंतरराष्ट्रीय बेट असल्याचं जाणवतं, असा खोचक टोला त्यांनी मोदी सरकारला लगावला. आम्ही जणू शत्रू राष्ट्राचे नागरिक आहोत, असा व्यवहार केंद्र सरकार आमच्याशी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |

एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देणार : ना. एकनाथ शिंदे |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
आर.टी.ई अंतर्गत राज्यातील इंग्रजी स्कूलचे २४०० कोटी थकले |