उद्या संविधान दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन

सातारा : संविधान दिनानिमित्त मंगळवार दि.२६ रोजी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दीक्षाभूमी बुद्धविहार, तारळे येथे सकाळी १० वा. भारतीय बौद्ध महासभा व बौद्ध विकास सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत केलेल्या कार्यक्रमास उपासक व उपासीकेनी उपस्थीत रहावे. असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळी १०.४० वा.संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे करण्यात आले आहे. प्रथमतः पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. वंदना, प्रास्ताविकेचे वाचन, मनोगत आदी कार्यक्रम होणार आहेत. तेव्हा संविधान प्रेमींनी उपस्थित रहावे. असे आवाहन संविधानप्रेमींच्यावतीने संविधान लोकजागर परिषदेचे संघटक अनिल वीर यांनी केले आहे.

दीक्षा नगरी भीमनागर, ता. महाबळेश्वर येथे भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व भीम क्रांती युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय कार्यक्रमांचे आयोजन सकाळी १० वा. करण्यात आले आहे. तेव्हा महासभेची शाखा  क्र.१,२, ३ व ४ मधील पदाधिकारी, कार्यकर्ते, उपासक व  उपासिका यांनी वेळेवर उपस्थीत रहावे. असे आवाहन अध्यक्ष नितीन गायकवाड व सरचिटणीस अनिल सपकाळ यांनी केले आहे.

मागील बातमी
मारहाण प्रकरणी तीन जणांवर गुन्हा
पुढील बातमी
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत अद्यापही महायुतीत मंथन

संबंधित बातम्या