सातारा : युवतीच्या विनयभंग प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 ते 12 दरम्यान सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका युवतीचा पाठलाग करून तिच्याशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी ओंकार सुनील चौधरी रा. दुर्गा पेठ, सातारा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटोळे करीत आहेत.