साउंड सिस्टीमवरून वाद; टोळक्यांनी दोघांवर केला चाकू हल्ला; १२ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 02 April 2026


सातारा : करंजे येथील कमानी नजीक आणि सदर बझार येथील बुवा पान शॉपच्या पाठीमागे १२ जणांच्या टोळक्यांनी दोन मित्रांना बेदम मारहाण करत चाकू हल्ला केल्याची घटना दि.२९ मार्च रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी स्मित संतोष पवार (वय २२ रा. करंजेपेठ, सातारा) याने सातारा शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.या प्रकरणी १२ जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी.स्मित पवार हा करंजे येथे मित्र अजय घागरे याची गाडी देण्यासाठी मित्र अक्षय कदम याच्यासोबत आला असताना साऊंड सिस्टिमच्या वरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून संशयित आरोपी ऋषिकेश धोत्रे व बागवान रेहान शिकलगार यश जाधव आणि यश झिंगरे (सर्व रा.सदर बाजार सातारा) सुशांत जाधव आणि यु.के (पूर्ण नाव माहिती नाही( दोघे रा. पोगरवाडी, सातारा) यांनी तामजाईनगर येथील राहणारा समर व त्याच्या दोन अनोळखी मित्रांनी स्मित पवार यास तुला लय मस्ती आली आहे तू पोगरवाडी येथे मांडणे मिटवायला होतास तुला आता सोडणार नाही असे म्हणून शिवीगाळ करत फिर्यादी आणि त्याचा मित्र अक्षय याला धारदार हत्यारने मारहाण करण्यात आली. 

यावेळी बेदम मारहाण केली. तसेच संशयित आरोपी अमोल मंगावणे, अक्षय धोत्रे, ऋषिकेश धोत्रे आणि यश जाधव यांनी तुला जिवंत सोडणार नाही, खाल्लास करतो अशी धमकी देत दोघांना त्यांच्या मोपेड गाडीवर जबरदस्तीने बसवून हायवेला घेऊन गेले. त्यानंतर तेथे ऋषिकेश धोत्रे याला फोन आला म्हणून त्यांनी फिर्यादीला सदरबझार येथील बुवा पान शॉपच्या मागे घेऊन गेले. तेथे नेऊन दोघांना पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली. या गंभीर घटनेची दखल उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी घेत घटनास्थळी भेट दिली.घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ढेरे करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
थकीत मानधन, वाढता आर्थिक ताण आणि कामगारविरोधी धोरणांविरोधात आशा सेविकांचा झेडपीसमोर एल्गार
पुढील बातमी
करंडी झरेवाडी येथे विजेचा खांब उभारण्यावरून मारहाण; सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद

संबंधित बातम्या

भीषण स्फोटाने तासवडे एमआयडीसी परिसर हादरला; एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट तासवडे : तासवडे एमआयडीसीमधील (ता. कराड) एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. पहिल्या भीषण स्फोटानंतर आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झालेे. स्फोटाच्या आवाजामुळे एमआयडीसीच्या 10 किलोमीटर परिसरातील गावांतील ग्रामस्थांच्या अक्षरशः कानठळ्या बसल्या. तसेच, परिसरातील गावांमधील घरांना तडे जाण्यासह खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने कंपनी बंद असताना ही दुर्घटना घडली आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. एमआयडी