जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा मोर्चा

by Team Satara Today | published on : 09 September 2025


सातारा : ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सातारा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने सोमवार, दि. 8 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषद कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला.

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना किमान वेतन अनुदान वेळेवर मिळावे, सुधारित किमान वेतन दर जाहीर करावा, नवीन वेतनश्रेणी व पेन्शन लागू करावी, वेतनावर 100 टक्के अनुदान द्यावे, जिल्हा परिषद भरतीमध्ये 10 टक्के आरक्षित जागांमध्ये भरती करावी. यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. यासाठीच सातार्‍यात पोवई नाका ते जिल्हा परिषद असा मोर्चा काढण्यात आला. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष प्रा. तानाजी ठोंबरे, सरचिटणीस नामदेव चव्हाण, राज्य सचिव कॉ. शामराव चिंचणे व पदाधिकारी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
‘ज्युनियर ॲथलेटिक्स’मध्ये श्रेया सावंतला कांस्यपदक
पुढील बातमी
कोरेगाव एस. टी. आगारात नवीन पाच बसेसचे लोकार्पण

संबंधित बातम्या