सातारा : शैक्षणिक वर्ष 2024-2025 मध्ये राज्यातील अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी.अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाने मंजूरी दिलेली असून इच्छूक उमेदवारांनी 6 सप्टेंबर पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.
योजनेंतर्गत अल्पसंख्यांक समुदायातील पात्र विद्यार्थ्यांनी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणेबाबतचा अर्ज आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे 3, चर्च रोड, पुणे-01 यांचे कार्यालयास सादर करावयाचे आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबरपर्यंत अर्ज समक्ष किंवा पोस्टाने सादर करावयाचा आहे.