सातारा : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आपाआपसात मारामारी करत असल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. ऋषभ विजय थोरात (वय 26, रा. विलासपूर, सातारा) व पृथ्वीराज किशोर यादव (वय 21, रा. गुरुवार पेठ, सातारा) अशी दोघांची नावे आहेत. ही घटना दि. 20 मार्च रोजी घडली आहे.
सार्वजनिक शांततेचा भंग प्रकरणी दोनजणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 21 March 2025