सातारा : शहरातील शनिवार पेठेतील तेली खड्डा परिसरातून दोन महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
आफरीन मुन्ना शेख (वय २८) आणि झैनब सलमान खान (रा. शनिवार पेठ, तेली खड्डा, सातारा) या दोघी आपल्या राहत्या घरातून कोणाला काहीही न सांगता अज्ञात ठिकाणी निघून गेल्या आहेत. त्या अद्याप घरी परत न आल्याने त्यांचे वडील मुन्ना लतीफ शेख (वय ५८) यांनी पोलिसांकडे धाव घेत मिसिंगची तक्रार नोंदवली आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करत असून, दोघींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.