स्वाती देसाई, भारती ओंबासे यांचा शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मान

उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

by Team Satara Today | published on : 22 September 2025


सातारा  : राज्य शासनाच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२४-२५ साठी सातारा जिल्ह्यातील माध्यमिक विभागातून स्वाती देसाई आणि प्राथमिक विभागातून भारती ओंबासे या दोन शिक्षिकांची निवड झाली होती.

या पुरस्काराचे वितरण आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण आयुक्त रणजित देवल व इतर मान्यवर उपस्थित होते.

स्वाती देसाई या सध्या माध्यमिक विभागाचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, भुईंज (ता. वाई) येथे कार्यरत आहेत. तर, प्राथमिक विभागातील भारती ओंबासे या जिल्हा परिषद शाळा वाघमोडेवाडी (ता. माण) याठिकाणी कार्यरत आहेत. या दोन विभागांतील शिक्षिकांना उल्लेखनीय कार्याबद्दल मिळालेल्या पुरस्काराबद्दल विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कृष्णानगर येथील पाटबंधारे विभागाच्या अधीक्षकाच्या घरात चोरी
पुढील बातमी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान - माण-खटाव तालुकास्तरीय कार्यशाळेचे

संबंधित बातम्या