सातारा दि २० (प्रतिनिधी)
डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति दिनाचे औचित्य साधून आज महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, सातारा यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर निवास स्थानी येथे भेट घेऊन जादूटोणा विरोधी कायदा संपूर्ण देशात लागू व्हावा यासाठी केंद्र शासनाने पावले उचलावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात नमूद आहे की समाजात मोठ्या संख्येने सुरू असलेल्या बुवाबाजी, शोषण यामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होऊन जात आहेत, त्यातच हातरस सारख्या घटनेतून शेकडो गरीब, लोकांचे प्राण जात आहेत म्हणून महाराष्ट्र राज्याचे प्रमाणे संपूर्ण देशभर जादूटोणा विरोधी कायदा लागू व्हावा यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावी यासाठीचे निवेदन देण्यात आले .
त्यावेळी तत्काळ निवेदन पत्रावर कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना खासदार उदयनराजे भोसले महाराज यांनी दिल्या. केंद्र सरकारच्या सुकाणू समितीला या विधेयकासाठी निश्चित पाठपुरावा करू असे आश्वासन उदयनराजे यांनी दिले.