मलकापूर उड्डाणपुलाचे काम गतीने सुरू

by Team Satara Today | published on : 10 March 2025


कराड : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावरील कराडच्या कोल्हापूर नाका ते मलकापूरपासून पुढे सुमारे साडेतीन किलोमिटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम अतिशय गतीने सुरु आहे. येथील उड्डाणपुलाचे पिलर काही महिन्यांपुर्वी अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने जमीनदोस्त केले होते. तेथे आता मोठेमोठे पिलर उभा करुन त्यावर रस्ता तयार केला जात आहे. तसेच पावसाळ्यात आडचण येऊ नये म्हणून उभा राहिलेल्या पुलाच्या खालूनही रस्ता तयार करण्याचे काम गतीने सुरु आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथील प्रवास सुखकर होण्याची शक्यता आहे. 

पुणे-बंगळूर आशियाई महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम गतीने सुरू आहे. या कामांतर्गतच कराड ते मलकापूर दरम्यान सुमारे साडेतीन किलोमीटर अंतराचा उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. त्यासाठी कराडच्या कोल्हापूर नाक्यावर व मलकापूर हद्दीत ढेबेवाडी फाटा व कृष्णा हॉस्पिटलसमोर असलेला उड्डाणपूल पाडण्यात आला आहे. अत्याधुनिक रोबोट कट्टरच्या सहाय्याने उभा असलेले पिलर कट करुन त्यानंतर मोठ्या पोकलॅन मशिनच्या मदतीने पिलरला धक्का मारून पाडले आहेत.

त्यानंतर मोठमोठे सिंगल पिलर उभा करून त्यावरुन रस्ता तयार केला जात आहे. ढेबेवाडी फाटा ते कोल्हापूर नाक्यापर्यंत तसेच डीमार्टसमोरील पुढील बाजूस रस्त्याचे काम गतीने सुरु आहे. येथे बहुतांशी पुल तयार करण्यात आला आहे. तर तयार झालेल्या पुलाखालून आठ पदरी लेन तयार करण्याचे काम सुरु आहे. हे काम लवकरच पुर्ण करण्याचा विचार ठेकेदाराचा असून पावसाळ्यात लोकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ठेकेदाराचे प्रयत्न सुरु आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुबईत भारत चॅम्पियन, पण पाकिस्तानात वाद शिगेला
पुढील बातमी
पनीरच्या नावाखाली विकला जातोय 'हा' भलताच पदार्थ

संबंधित बातम्या