सातारा : सातारा शहरसह शाहूपुरी पोलिसांनी तीन चक्री जुगार अड्ड्यांवर कारवाया करीत चार जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 रोजी सातारा शहरातील करंजे नाका येथील ओम जेन्ट्स पार्लर सलून दुकानाच्या शेजारील शेडमध्ये सुरू असलेल्या चक्री जुगार अड्ड्यावर छापा टाकून शाहूपुरी पोलिसांनी मयूर काशिनाथ राठोड रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा याच्यावर कारवाई करत सीपीयू, मॉनिटर, की-बोर्ड तसेच रोख रक्कम असा दहा हजार चारशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दुसऱ्या कारवाईत शहरातील जुना मोटर स्टॅन्ड येथील बल्लाळ वेल्डिंग वर्क्स दुकाना शेजारी असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून निलेश सुरेश पवार रा. करंजे पेठ सातारा याच्यावर कारवाई करत दहा हजार एकशे पन्नास रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तिसऱ्या कारवाईत, सातारा शहर पोलिसांनी बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून शुभम सत्यवान कांबळे रा. विकास नगर, सातारा आणि तनवीर अश्रफ शेख रा. पिरवाडी, सातारा यांच्यावर कारवाई करत 15 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.