सातारा : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 रोजी बारा वाजण्याच्या सुमारास एका महिलेस अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी प्रतिक विश्वासराव लोखंडे रा. वनवासवाडी, सातारा याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गुरव करीत आहेत.