जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर

२६,२७ जुलैला घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट

by Team Satara Today | published on : 24 July 2025


सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून आता मुंबई वेधशाळेने २४ आणि २५ जुलै रोजी रेड अलर्ट दिला आहे. यामुळे पश्चिम भागातील घाट परिसरात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर २६ आणि २७ जुलैलाही घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट आहे.

सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी राहते. तर पश्चिमेकडे धो-धो पाऊस पडत असतो. पण, मागील आठवड्यापासून पश्चिम भागातच पाऊस कमी झाला होता. प्रमुख धरण पाणलोट क्षेत्रातही उघडझाप सुरू होती. असे असतानाच मंगळवारी सायंकाळपासून पश्चिम भागात पाऊस वाढला आहे. तसेच पुढील काही दिवस जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.

मुंबई वेधशाळेच्या अंदाजानुसार दि. २४ आणि २५ जुलै रोजी सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भाग घाट परिसराला रेड अलर्ट दिलेला आहे. तसेच २६ आणि २७ जुलै रोजीही याच घाट परिसरात आॅरेंज अलर्ट आहे. यामुळे पावसाचा जोर वाढणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कुट्टी मशिनमध्ये अडकून युवकाचा मृत्यू
पुढील बातमी
कराडमध्ये जलशुद्धीकरण केंद्रात सापांचा वावर

संबंधित बातम्या