सेवा संकल्प अभियानांतर्गत खंडाळा येथे भटक्या-विमुक्त समाजातील १५ लाभार्थ्यांना जातीच्या दाखल्यांचे वाटप

by Team Satara Today | published on : 30 September 2026


सातारा :  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव तथा सातारा जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. संजीव कुमार यांनी खंडाळा येथील तहसील कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते भटके विमुक्त प्रवर्गातील १५ गरजू नागरिकांना जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.  
विविध योजना आणि सेवांचा लाभ थेट शेवटच्या घटकापर्यंत जलद गतीने पोहोचावा, यासाठी सेवा संकल्प अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत प्रलंबित अर्जांचा निपटारा करून नागरिकांना आवश्यक असणारे विविध शासकीय दाखले व प्रमाणपत्रे गतीने उपलब्ध करून दिली जात आहेत.
या कार्यक्रमा प्रसंगी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक व लाभार्थी उपस्थित होते. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
म्हसवड येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत बालसुरक्षा आणि कायद्यांविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न
पुढील बातमी
ऑक्टोबर महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द; निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची माहिती

संबंधित बातम्या