साताऱ्यात जलमंदिर पॅलेस येथे मंत्री गिरीश महाजन-खासदार उदयनराजे भोसले भेट; राजकीय चर्चांना उधाण

by Team Satara Today | published on : 09 April 2026


सातारा  : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी साताऱ्यात जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. सुमारे अर्धा तास बंददरवाजा चर्चा झाल्यानंतर या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले जात असले तरी दोन्ही नेत्यांमधील संवादाचे पडसाद राजकीय पातळीवर उमटू लागले आहेत. बैठकीनंतर मंत्री महाजन शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाले. गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अन भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या या भेटीकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे.

साताऱ्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात असून आगामी राजकीय समीकरणांबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात उद्यापासून भव्य ‘हिरकणी महोत्सवा’चा जागर; महिला उद्योजकता आणि संस्कृतीचा अनोखा संगम
पुढील बातमी
राजकीय संघर्ष आता कायदेशीर टप्प्यावर; राष्ट्रवादी सदस्यांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल; कामेश कांबळे, ऋतुजा शिंदे, लता कर्णे यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी

संबंधित बातम्या