सातारा : गडकर आळीत चेन स्नॅचिंग केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात राहणारी एक महिला गडकर आळी परिसरातून जात असताना दोन जणांनी पाठीमागून येऊन महिलेच्या गळ्यातील 17.30 ग्रॅम वजनाचे, 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून चोरून नेले आहे. याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक साबळे करीत आहेत.
साताऱ्यात गडकर आळी येथे चेन स्नॅचिंगची घटना; शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 08 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा