ज्याचे डिपॉझिट विधानसभेला जप्त झाले, त्याने स्वतःच्या वयाचे व लायकीचे आत्मपरीक्षण करावे; अंकुश कदम यांच्या वक्तव्याचा भाजपच्या नगरसेवकांकडून निषेध

by Team Satara Today | published on : 08 November 2026


सातारा : ज्याचे डिपॉझिट विधानसभेला जप्त झाले, त्याने स्वतःच्या वयाचे व लायकीचे आत्मपरीक्षण करावे, अशा शब्दांत मेढा नगरपंचायतीच्या  नगराध्यक्षा, उप-नगराध्यक्ष,बांधकाम, महिला बालकल्याण, आरोग्य विभागाचे सभापती व भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक यांनी अंकुश कदम यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे.
यावेळी नगराध्यक्षा सौ. रूपाली वारागडे, उपनगराध्यक्ष विकास  देशपांडे, सभापती शिवाजीराव देशमुख, सभापती नितीन मगरे, धनंजय पवार व भाजपाचे सर्व नगरसेवक तसेच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल देशपांडे, संतोष वारागडे, नगरसेवक हरीष तिवाटणे, शिवाजी गोरे, सुशांत कांबळे उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, अंकुश कदम यांनी मेढा नगरिमध्ये निषेध मोर्चा काढून मेढा येथील छ. शिवाजी महाराज चौकात आदरणीय छत्रपती घराण्याबद्दल जी गरळ ओकली, ही गरळ ओकताना अंकुश कदम याने आपली स्वतःची उंची, लायकी, पातळी सोडून खालच्या थराला जाऊन केले.
ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे राज्यात एक नंबर मतांनी निवडून आलेले आहेत. अंकुश कदम आपण मुंबई सारख्या ठिकाणी विधानसभेला निवडणूक लढविली, त्या निवडणुकीत आपले स्वतःचे डिपॉझिट आपल्याला वाचविता आले नाही.तिथेच आपली लायकी संपूर्ण जावळी तालुक्याला समजली.त्यामुळे आपण स्वतः आपली लायकी तपासावी. तसेच महाराज साहेब या मतदार संघात चार वेळा विधानसभेला निवडून आले. त्यावेळेस आपणाला मतदानाचा अधिकार पण नसेल, हे आपण विसरलात का?
मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीत आपली लायकी तपासून घ्यावी. जावळीतील सूज्ञ मतदार व नागरिक हे कायमस्वरूपी आदरणीय महाराज साहेबांसोबत होते, आहेत आणि राहणार.
आपण ठेकेदार, रस्ता, पैसा, मान, मस्ती असे आपण भाषणातून गरळ  ओकली. आपण मराठा मोर्चाच्या काळात वाशीला नवी मुंबई येथे कोणाचा ठेका घेतला? कोणाच्या वेगळ्या पद्धतीची माया गोळा केली? याचे उत्तर सुज्ञ जावळीकरांना द्यावे.
सारखे जावळीचा सुपुत्र असल्याचे बोलता, मग जावळीसाठी काय केलं त्यावर बोला. जावळीच्या विकासासाठी काय केलं त्यावर बोला. ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे आमचे दैवत आहेत. अंकुश कदम कुठं इंद्राचा ऐरावत, कुठं श्यामभटाची तट्टानी? शिवेंद्रराजेंबद्दल पुन्हा बोलाल तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असाही इशारा निषेधकर्त्यांनी दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत वंचित बहुजन आघाडीची ‘काळी दिवाळी’; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी-भाकर खाऊन सरकारचा निषेध
पुढील बातमी
साताऱ्यात गडकर आळी येथे चेन स्नॅचिंगची घटना; शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा

संबंधित बातम्या