विलासपुरमध्ये घरफोडी; सुमारे साडेसात तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास

by Team Satara Today | published on : 11 August 2026


सातारा : विलासपुर मध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे साडेसात तोळे वजनाचे दागिने लंपास केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 रोजी दुपारी एक ते पाच वाजण्याच्या दरम्यान जितेंद्र रवींद्र कदम रा. विलासपूर, गोडोली, सातारा यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सुमारे साडेसात तोळे वजनाचे, 4 लाख 48 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हद्दपारआदेशाचा भंग केल्याप्रकरणी कोंडवे येथील एकावर गुन्हा
पुढील बातमी
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या