सातारा : पुणे बंगलोर महामार्गावर रात्री पुणे बाजूकडून सातारा चे दिशेने येणारे पत्रकार जुबेर शब्बीर शेख (वय ३२, कुडाळ ता जावली) जोशीविहिर (ता वाई) येथे उड्डाणपूलावर पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला धडकल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र कवठे (ता वाई) येथे दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.जुबेर शेख हे टीव्ही वृत्त वाहिनीसाठी छायाचित्रणाचे काम करत होते. याशिवाय ते सातारा येथील एका दैनिकात बातमीदार म्हणून काम करत होते.एका लग्न समारंभाहुन ते कुडाळ येथे घरी जात होते.तेव्हा त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी एक वर्षाची मुलगी व छोटा भाऊ आहे.कुडाळ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे. या अपघाताबाबत सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार वैभव टकले तपास करीत आहेत,
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
गळफास घेऊन सातारा शहरातील अल्पवयीन मुलाची आत्महत्या
June 17, 2026
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा
June 17, 2026
प्रेमलाताई स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेचे आयोजन
June 17, 2026