कोयना धरण ९१.४२ टक्के भरले; कोयना ३६४१ मिलिमीटर, नवजा ४५२५ मिलिमीटर पावसाची नोंद

by Team Satara Today | published on : 14 August 2026


सातारा : कोयना धरणातील छत्रपती शिवाजी महाराज जलसागरमध्ये सध्या उपलब्ध ९६.२२ टीएमसी तर उपयुक्त ९१.१० टीएमसी पाणीसाठा आहे. १ जूनपासून आत्तापर्यंत कोयना ३६४१ मिलिमीटर, नवजा ४५२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ ९.०३टीएमसी पाण्याची गरज असून सध्या धरण ९१.४२ टक्के भरले आहे.

कोयना धरणांतर्गत विभागात पडणारा पाऊस व धरणाची संपुष्टात येत असलेली पाणी साठवण क्षमता लक्षात घेता गुरूवारी सायंकाळी धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फूट वर उचलून त्यातून ६,८२७ व धरण पायथा वीजगृहातील एक जनित्र पुन्हा कार्यान्वित करुन त्याद्वारे १०५० असे प्रतिसेकंद ७,८७७ क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदी पात्रात सोडण्यात आले आहे.

धरणातून सोडण्यात आलेले पाणी व पूर्वेकडे पडणारा पाऊस यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीकाठची गावं, लोकवस्त्यांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर अंतर्गत छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सध्या प्रतिसेकंद सरासरी १४,१०२ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यातील सर्व शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे : सुषमा राजेघोरपडे
पुढील बातमी
कराड शहराभोवती प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी नेकलेस रोड प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा सादर; व्हिडिओ चित्रफितीच्या माध्यमातून नगरपालिकेत प्रकल्पाचे सादरीकरण

संबंधित बातम्या