सातारा : किरकोळ कारणावरुन एकास मारहाण केल्याप्रकरणी दोन अज्ञातांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दुचाकीवरील मास्क लावलेले दोघेजण ओळखीचे वाटल्याने ‘काय रे,’ असे म्हटले. मात्र दोघेजण अनोळखी होते. त्या संशयितांनी जितेंद्र विजय पवार (वय 32, रा.दौलतनगर, सातारा मूळ रा. मर्ढे ता.सातारा) यांना बेसबॉलच्या स्टीकने मारहाण केली.
ही घटना दि. 1 मे रोजी जरंडेश्वर नाका येथे घडली आहे. संशयितांनी केलेल्या मारहाणीत तक्रारदार यांच्या पायावर 3 टाके, पाठीवर 2 टाके, डोक्यात 8 टाके, उजव्या हातावर 5 टाके पडले असून गंभीर दुखापत झाली आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.