11:58am | Oct 02, 2024 |
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं नशीब बलवत्तर ठरलं. कारण पु्ण्यात जे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला, ते तटकरेंना आणण्यासाठी मुंबईला निघाले होते, अशी माहिती समोर येत आहे. दिल्लीच्या हेरिटेज एव्हिएशन कंपनीच्या मालकीचे ट्वीन इंजिन ऑगस्टा १०९ हेलिकॉप्टर बावधन बुद्रुक परिसरातील डोंगराळ भागात अपघातग्रस्त झाले. सुनील तटकरे यांना आणण्यासाठी मुंबईत पोहोचण्याआधीच दुर्घटना घडली. या अपघातात दोन पायलट आणि एका इंजिनिअरला प्राण गमवावे लागले.
परळी येथे काल धनंजय मुंडे यांच्या सभेसाठी संबंधित हेलिकॉप्टर सुनील तटकरे यांना घेऊन गेले होते. परळीहून काल रात्री उशिरा हेलिकॉप्टर पुण्याला आले. तर राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी मुंबईला अमित शाह यांची भेट घेण्यासाठी आले. काल पुण्यात थांबलेले हेलिकॉप्टर मुंबईहून सुनील तटकरे यांना रायगड येथील निवासस्थानी नेणार होते, मात्र त्याआधीच हा दुर्दैवी अपघात झाला. कुठे झाला अपघात? पुण्यामध्ये पुन्हा एकदा हेलिकॉप्टर दुर्घटना घडली आहे. ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास उड्डाण केलं होतं. काही अंतर कापल्यानंतरच हेलिकॉप्टरला बावधन बुद्रुक परिसरामध्ये अपघात झाला. ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्ट आणि एचईएमआरएल या केंद्र सरकारची संस्थेच्या परिसरादरम्यान असलेल्या डोंगराळ भागात हेलिकॉप्टर पडले.
धुक्यात अडकून अपघात धुक्याचा अंदाज न आल्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघातानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला. याबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांना फोन आला. त्यानंतर हिंजवडी पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले.
पुणे जिल्ह्यात ४० दिवसांच्या कालावधीत घडलेली ही दुसरी हेलिकॉप्टर दुर्घटना असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. २४ ऑगस्ट रोजी पौड भागातील घोटोडे भागाच्या हद्दीत एका डोंगराजवळ हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. त्यावेळी मुंबईतून उड्डाण केलेले हेलिकॉप्टर आंध्र प्रदेशला जात असताना दुर्घटनाग्रस्त झालेले. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण चार जण प्रवास करत होते, त्यापैकी दोघे जण गंभीर जखमी झाले, परंतु कुठलीही जीवितहानी झाली नव्हती.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |