सातारा : तीन वाहनांची तोडफोड करून नुकसान केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अतुल अनिल आपटे व महेश रामचंद्र कुलकर्णी (रा. मंगळवार पेठ, सातारा) यांच्या तीन गाड्यांवर काही कारण नसताना दगड मारुन त्यांचे सुमारे एक लाख पाच हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी अतुल विलास ठोंबरे (रा. शाहूपुरी, सातारा) याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.
साताऱ्यात मंगळवार पेठेत तीन वाहनांची तोडफोड करून नुकसान केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 01 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा