राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात

खासदार उदयनराजे यांच्या पाठपुराव्याला यश; रंगकर्मींचे सुद्धा जोरदार प्रयत्न

by Team Satara Today | published on : 08 October 2024


सातारा : सातारा जिल्ह्यात राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातार्‍यात व्हावे, यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र म्हणून सातारा जिल्ह्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या निर्णयाचे रंगकर्मींनी स्वागत केले आहे.

नवीन नाट्यसंहितेच्या नियमावलीत मागील सतरा वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील केंद्र बंद झाले होते. सातारा शहरासह जिल्ह्यातील नाट्यकर्मी व नाट्य रसिक राज्य नाट्य स्पर्धेला मुकला होता. पूर्वी दरवर्षी फक्त तीन ते चार संघ सातारा जिल्ह्यातून राज्य नाट्य स्पर्धेसाठी जिल्हा बाहेर जात. परंतु अलीकडच्या काळात श्रीनिवास एकसंबेकर, राजेश मोरे, विक्रम बल्लाळ, रमेश खांडेकर, अभिजीत वाईकर, शशी गाडे, महादेव शिरोडकर व इतर रंगकर्मींच्या प्रयत्नातून सातार्‍यातून राज्य नाट्य स्पर्धाकरता बारा संघ उभे राहिले. या सर्वांकडूनच राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात व्हावे, या मागणीसाठी सकारात्मक दबाव शासनावर आला.

याच पार्श्वभूमीवर रंगकर्मींच्या वतीने बाळासाहेब शिंदे यांनी जिल्ह्यातील जवळपास 25 संघाची मोट बांधत शासन दरबारी केंद्राची मागणी केली होती. दोन वर्षांपूर्वी उपकेंद्राची निर्मिती झाली. परिणामी सांगली उपकेंद्राच्या रूपात सातारा जिल्ह्यात राज्य नाट्य स्पर्धा आली. या उपकेंद्रावर 2022 मध्ये 12, तर 2023 मध्ये 13 नाटके सादर झाली. हा वाढता प्रतिसाद पाहून राज्य नाट्य स्पर्धा समन्वयक कल्याण राक्षे यांनी सर्व रंगकर्मीच्या वतीने खासदार उदयनराजे यांच्याकडे सातारा उपकेंद्राचे केंद्र व्हावे, अशी मागणी केली. खासदार उदयनराजे यांनी या मागणीचा शासन दरबारी सततचा पाठपुरावा केला. त्यामुळे सातारा जिल्ह्यात राज्यनाट्य स्पर्धेचे केंद्र आले आहे. राज्यनाट्य स्पर्धेच्या सातारा केंद्राची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली आहे. रंगकर्मींच्या वतीने त्यानुषंगाने आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खोटं बोलणार्‍या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी
पुढील बातमी
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन

संबंधित बातम्या