12:42pm | Sep 09, 2024 |
पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशातच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सध्या अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठीची रणनिती आखल्याचं दिसत आहे. समरजित घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे कोल्हापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. त्यानंतर आता पुण्यात देखील भाजपचे वरिष्ठ नेते राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. गणेशोत्सवातील एका कार्यक्रमात त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
पुण्यातील वडगाव शेरीत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार आणि भाजपचे नेते बापूसाहेब पठारे हे भाजपला रामराम करण्याची शक्यता आहे. पठारे यांची लवकरच घरवापसी होण्याची शक्यता आहे. बापूसाहेब पठारे गणपती मंडळाच्या कार्यक्रमातून हाती तुतारी घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
बापूसाहेब पठारे सध्या भाजपमध्ये आहेत. राष्ट्रवादीचे दोन गट पडले. अजित पवार गट हा भाजपसोबत गेला. राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे वडगाव शेरीचे आमदार आहेत. त्यामुळे ही जागा अजित पवार गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. वडगाव शेरीची जागा भाजपकडे नसल्याने बापूसाहेब पठारे नाराज आहेत. थेट गणपती मंडळाच्या कार्यक्रमातूनच हाती तुतारी घेण्यात असल्याचे संकेत दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आपलं चिन्ह तुतारी असल्याचं बापूसाहेब पठारे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पठारे हे लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
इंदापुरातील बॅनरने लक्ष वेधलं
पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्येदेखील राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे. इंदापूरमधील बॅनरने लक्ष वेधलं आहे. इंदापूरच्या आठवडे बाजार आणि आज एक फ्लेक्स भरचौकात लागला होता. त्यावर शरद पवार पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचे फोटो आहेत. त्यावर लिहिलेला मजकूर लक्ष वेधून घेत आहे. ‘इंदापूर तालुक्याची झाली तयारी… हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी’, असं या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे.
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी |
गोडोली येथील भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सोमवारी व्याख्यान |