विकासनगर येथून दुचाकीची चोरी; सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार

by Team Satara Today | published on : 26 August 2026


सातारा : विकासनगर येथून दुचाकीची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विकासनगर, सातारा येथून अज्ञात चोरट्याने (एमएच 13 डीएस 7904) या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. 21 ऑगस्ट रोजी घडली आहे. याप्रकरणी गणेश विलास पवार (वय 30, रा. विकासनगर) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पोलीस करमणूक केंद्रासमोर दोन दिवसांपूर्वी झालेल्या राड्याप्रकरणी सातजणांवर गुन्हा
पुढील बातमी
युवतीला वेश्यागमनासाठी ठेवल्याप्रकरणी एकावर गुन्हा; संबंधित युवतीची पोलिसांनी केली सुटका

संबंधित बातम्या