शेअर मार्केट ट्रेडिंगमधून मोठा नफा देण्याचे आमिष दाखवत फलटणच्या सराफाला ४२ लाखांचा गंडा

by Team Satara Today | published on : 26 July 2026


फलटण : शेअर मार्केट ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत फलटण येथील एका सराफ व्यावसायिकाची तब्बल ४२ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अर्थ मनीष गांधी (वय २५) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी फोन व व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधून स्वतःला शेअर मार्केट ट्रेडिंगमधील तज्ज्ञ असल्याचे सांगितले. तसेच एआयएफ व शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर संशयितांनी विविध ट्रेडिंग प्लॅटफॉर्म व बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने रक्कम गुंतवण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने बँक व्यवहार व यूपीआयद्वारे एकूण ४२ लाख रुपये संशयितांनी सांगितलेल्या खात्यांमध्ये जमा केले.

ट्रेडिंग खात्यात मोठा नफा झाल्याचे दाखवत संशयितांनी आणखी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. मात्र, गुंतवलेली रक्कम परत मागितल्यानंतर मार्जिन भरणे, ट्रेडिंग पोझिशन्स रिलीज करणे आदी कारणे सांगून संशयितांनी आणखी पैशांची मागणी केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने फलटण शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक परशराम वाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलिस पुढील तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संविधानाने दिलेले समान हक्क तृतीयपंथीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध - जिल्हाधिकारी संतोष पाटील; जिल्हास्तरीय तृतीयपंथीय व्यक्ती सक्षमीकरण शिबिर
पुढील बातमी
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी वारीच्या व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक; पंढरपूर येथे ‘निर्मल वारी’ व ‘चरणसेवा’ या उपक्रमांचा समारोप

संबंधित बातम्या