अवैध दारु प्रकरणी तिघांवर कारवाई

by Team Satara Today | published on : 26 October 2024


सातारा : वनवासवाडी, ता. सातारा येथे अवैधरीत्या दारु विक्री करणार्‍या अजय विजय सावंत (वय 24, रा. खोकडवाडी, ता. सातारा) याच्या दि. 25 रोजी रात्री 11 वाजता पोलीस कॉन्स्टेबल सचिन रिटे यांनी कारवाई केली. त्यांच्याकडून पाच लाख 6 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

दुसर्‍या घटनेत, कण्हेर, ता. सातारा गावच्या हद्दीत वाघजाईन्गार एसटी स्टॉपच्या आडोशाला अर्जुन रामचंद्र तुपे (वय 61, रा. कण्हेर) हा अवैधरीत्या दारु विक्री करत असताना पोलीस कॉन्स्टेबल धीरज पारडे यांनी कारवाई केली. दि. 25 रोजी सायंकाळी 6 वाजता ही कारवाई केली असून, त्याच्याकडून 2 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तिसर्‍या घटनेत, आकाशवाणी केंद्र येथील एका ठिकाणी विशाल बाळू चौगुले (वय 39, रा. मंगळवार पेठ, सातारा) हा दि. 25 रोजी अवैधरीत्या दारु विक्री करत होता. त्याच्याकडे 3 हजार 570 रुपयांचा माल सापडला असून, त्याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जुगार अड्डयांवर कारवाई
पुढील बातमी
अस्तित्व लपवल्याप्रकरणी कारवाई

संबंधित बातम्या