100 व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्यमहोत्सव

by Team Satara Today | published on : 08 February 2025


मुंबई  : 100 व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्ताने विविध भारतीय भाषांमधील नाटकांचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. मराठी नाट्य सृष्टीची शिखर संस्था म्हणजे नाट्यपरिषद. नाट्यपरिषद सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असते, ज्यामुळे नाटक, रंगकर्मी आणि प्रेक्षक यांच्यातील संबंध कायम राहतो. नाट्यपरिषद नाटक, रंगकर्मी आणि प्रेक्षक यांच्यातील सेतू म्हणून काम करत असताना अनेक अभिनव उपक्रम, संकल्पना राबवते आता 100 व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्यमहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100 व्या नाट्य संमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे पहिल्यांदाच विशेष नाट्य महोत्सवाचं आयोजन केलं आहे. नुकतीच नाट्यपरिषदेची परकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत विशेष नाट्य महोत्सवाची घोषणा करण्यात आली.  या पत्रकार परिषदेला नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर,  प्रमुख कार्यवाह अजित भुरे, कार्यकारिणी सदस्य सविता मालपेकर आणि प्रमुख मंडळी उपस्थित होती.   

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित विशेष  नाट्य महोत्सव 20 फेब्रुवारी ते 2 मार्चपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. मुंबईत भारतीय भाषांमधील हा नाट्य महोत्सव  रंगणार आहे. यशवंत नाट्य मंदिर, जयश्री आणि जयंत साळगांवकर प्रायोगिक रंगमंच, अण्णाभाऊ  साठे नाट्यगृह  या ठिकाणी या महोत्सवातील नाटकांचे सादरीकरण होणार आहे.  

या महोत्सवामागचा उद्देश असा की, मुंबईतील कलाकारांना आणि नाट्यरसिकांना वेगवेगळ्या राज्यातील, प्रांतातील नाटकं, त्यांचं सादरीकरण, तिथल्या कलाकारांविषयीच्या गोष्टी जाणून घ्यायला  मिळणार आहे, असं नाट्यपरिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी सांगितलं. बंगाली, तामिळ, इंग्रजी, मराठी अशा वेगवगळ्या भाषांमधल्या नाटकांचं सादरीकरण या विशेष नाट्य महोत्सवात होणार आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा येथे सोमवारी जिल्हा वंचिततर्फे टाळके फोड आंदोलन
पुढील बातमी
ठाकरे गट शिवसेनेचे साताऱ्यात जोडे मारो आंदोलन

संबंधित बातम्या